कडेपूर ग्रामपंचायतीने ‘स्मार्ट ग्राम’ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. तृप्ती दोडमिसे मॅडम आणि मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) श्री. शशिकांत शिंदे साहेब यांचे आभार मानले. पंचायत समिती कडेगाव येथे आयोजित कार्यक्रमात सौ. तृप्ती दोडमिसे मॅडम यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशालीताई यादव यांच्या हस्ते, तर श्री. शशिकांत शिंदे साहेब यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच श्री. सतीशभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा) श्री. किरण सायमोते साहेब, गटविकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत साहेब, उपगटविकास अधिकारी श्री. वाजे साहेब, कडेपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. पतंगराव यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री. दीपक परदेशी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. एस.डी. मुलाणी आणि कडेगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे अधिकारी उपस्थित होते.
कडेपूर ग्रामपंचायतीने आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून ‘स्मार्ट ग्राम’ संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळेच हे यश मिळाले आहे. या उपक्रमामुळे कडेपूर गाव प्रगती, एकता आणि समृद्धीच्या दिशेने पुढे जात आहे.
ग्रामपंचायतीच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल सर्व अधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले.






