


महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक २२ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यभरात ‘आदिशक्ती अभियान’ राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर मौजे कडेपूर ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सदर ग्रामसभा मा. सरपंच सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या विविध महिलाभिमुख योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे व महिलांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरण साधणे होय.
या ग्रामसभेत ग्रामस्तरीय ‘आदिशक्ती अभियान समिती’ खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली:
अनुराधा विजय यादव – अध्यक्ष
धनाजी व्यंकटराव यादव – सदस्य
अविनाश मोहनराव यादव – सदस्य
अशोक शंकर यादव – ग्रामदूत सदस्य
स्नेहल समीर झेंडे – स्वयंसेविका
संगीता सतीश शिर्के – महिला शिक्षिका सदस्य
चारुशीला अनिल यादव – महिला ग्रामदूत सदस्य
मनीषा मिलिंद यादव – महिला ग्रामदूत सदस्य
एस. डी. मुलाणी – ग्रामपंचायत अधिकारी सदस्य
राजकुमार यशवंत यादव – पोलीस पाटील सदस्य
शाकीरा अकबर मुलाणी – अंगणवाडी सेविका सदस्य सचिव
ही समिती गावात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा माहितीप्रसार, अंमलबजावणी आणि मागणीसाठी कार्यरत राहणार आहे.
ग्रामपंचायत कडेपूरच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.

