ग्रामसचिवालय कडेपूर
कडेपूर गावाची
यशोगाथा
कडेपूर गावाची यशोगाथा
ग्रामपंचायत स्थापना
गावाच्या ग्रामपंचायतीची स्थापना सन १९५५ साली झाली आहे. सध्या आमच्या आमच्या ग्रामपंचायतीची शासकीय योजनेच्या व ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायत मालकीच्या जागेत ७००० स्के. फुट इतकी दोन मजली आर. सी.सी. इमारत सर्व सोयीनियुक्त बांधणेत आलेली आहे. सन २०११ च्या जणगणनेनुसार त्यावेळची एकूण लोकसंख्या ५७३५ एवढी आहे. त्यापैकी पुरुष २९६० व स्त्रिया २७७५ एवढी आहे. त्यामध्ये मागासवर्गीय एकूण लोकसंख्या एवढी आहे. त्यापैकी पुरुष व खिया – एवढी आहे. सदर वेळी गावात कुटुंब संख्या ९९९ आहे. प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आमचे गाव हागणदारीमुक्त गाव म्हणून पुरस्कार प्राप्त झालेले आहे. तसेच गावामध्ये सार्वजनिक शौचालय २ युनिट बांधणेत आलेले आहेत.
गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी –
सांगली जिल्यातील कडेगाव तालुक्यामध्ये आमचे कडेपूर गाव आहे. गुहागर – विजापूर राज्य महामार्गालगत वसलेले गाव आहे. संपूर्ण तालुक्याचा मध्यबिंदू म्हणून आमच्या गावाला संभोदले जाते. याच गावातून तालुक्यातील सर्व गावांना जाणारे रस्ते जोडलेले आहेत. गावाच्या नैऋत्य दिशेला श्री डोंगराई देवीचे निसर्गरम्य पुरातन कालीन मंदिर असून सह्याद्रीच्या पर्वत रांगाची ख्यातीगावाला लाभलेली आहे. उंच उंच कडे डोंगर व फळा फुलांनी बहरलेला परिसर म्हणून गावाची ख्याती आहे. डोंगराई देवीचे मंदिर गावाचे ऐतिहासिक मंदिर आहे. या देवीची यात्रा श्रावण महिन्यात व माघ पोर्णिमेला भरते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात मधून भाविक येत असतात.
गावाचे ग्राम दैवत वडलाई देवी आहे. या देवीचे मंदिर पुरातन काळातील आहे. या देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात अक्षय तृतीयेला भरते. जागृत देवस्थान म्हणून वडलाई देवीची ख्याती गावात व परिसरात आहे. तसेच या देवीची नित्य नियमाने पूजा आरचा केली जाते. गावाच्या दक्षिणेस नांदणी नदी आहे. त्या नदीच्या तिरावरती देवटकी देवीचे मंदिर आहे. आमचे गावामध्ये पूर्वजांपासून तिथे देवटकी देवीची नित्यनियमाने पूजा अर्चा केली जाते. गावच्या उत्तरेस पुरातन काळातील महादेव मंदिर आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी व महाशिवरात्री या दिवशी भव्य यात्रा भरते.
गावातील मल्ल सम्राट साहेबराव यादव (वस्ताद काका) यांच्या कुस्ती कलेमुळे कडेपूर गावाचे नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. व स्वतंत्र सैनिक आण्णा बाळा यादव यांच्या हॉटेल मधील कॉफीमुळे गावाचे नाव राज्यभर झाले आहे. गावाला राजकीय वारसा म्हणून स्व. आमदार संपतराव (आण्णा) देशमुख यांच्या कार्यामुळे गावाचे नाव देशभर व देश्याच्या बाहेर झालेले आहे. आमच्या गावाला स्वतंत्र वीरांची परंपरा आहे. आमच्या गावचे पहिले सरपंच मा. बबनराव यादव देशमुख उर्फ भाऊसाहेब यांना राज्यस्तरीय शेतीनिष्ठ पुरस्कार सन्मानीत करणेत आले होते. आमच्या गावामध्ये सहकार क्षेत्रात, साखर उद्योग, सुतगिरणी, दुग्ध व्यवसाय व शिक्षण संस्था या मध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे.
गावची शैक्षणिक व्यवस्था –
आमचे गावामध्ये शासनच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत ८ अंगणवाडी केंद्र सुरु आहेत. सदर अंगणवाडी खोल्या आर. सी.सी. आहेत. सर्व अंगणवाडी खोल्या मध्ये लाईट, पंखे, पिण्याचे पाणी तसेच अंगणवाडी आहार शिजविण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत गॅस कनेक्शन सोय करून देवून अश्या प्रकारे अद्यावत स्वतंत्र इमारत बांधून देणेत आलेली आहेत. तसेच मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण करणेत आलेले आहे.
जिल्हा परिषद शाळा इ. १ ते इ. ७ वी पर्यंतची व्यवस्था करणेत आलेली आहे. सदर शाळेकरिता दोन माजली आर. सी. सी. इमारतीची व्यवस्था करणेत आलेली आहे. सदर शाळा डिजिटल व ई लर्निंग करणेत आलेली आहे. आमच्या गावाची जिल्हा परिषद शाळा शासनाच्या ISO मानांकन प्राप्त झालेली आहे. सध्या आमचे गावची जिल्हा परिषद शाळा मॉडर्न स्कूल स्पर्धेसाठी भाग घेतलेला आहे. सध्या सदर शाळेमध्ये २७६ मुले व मुली शिक्षण घेत आहेत. तसेच या शाळेतील विध्यार्थी विविध क्रिडा स्पर्धा, बौद्धिक चाचणी स्पर्धा मध्ये जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी होत आहेत.
आमचे गावामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित न्यू इग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सुरु करणेत आले आहे. त्यामध्ये इ. ५ ते इ. १२ पर्यंतचे शिक्षण दिले जाते. सदर शाळेमध्ये सर्व मुलींना ग्रामपंचायत मार्फत १०% महिला बाल कल्याण अंतर्गत मोफत सायकल वाटप करणेत आलेल्या आहेत. सदर शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शाळेचा गणवेश वह्या पुस्तके देण्यात आलेली आहेत. तसेच दरवर्षी देण्यात येतात. सदर शाळेकरिता ग्रामपंचायत मालकीच्या जागेवरती ग्रामपंचायत मालकीची ग्रामस्थाच्या सहकार्यातून स्वतंत्र अद्यावत अशी इमारत बांधकाम करून देणेत आलेली आहे. सदर शाळेत अद्यावत संगणक कक्ष उभारणेत आलेला आहे. तसेच सदर शाळेसाठी स्वतंत्र प्रयोगशाळेची इमारत आर.सी.सी. बांधून देणेत आलेली आहे. तसेच मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण करणेत आलेले आहे. तसेच या शाळेतील विध्यार्थी विविध क्रिडा स्पर्धा, बौद्धिक चाचणी स्पर्धा मध्ये जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी होत आहेत,
गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची अडचण लक्षात घेवून आमचे गावामध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय सुरु करणेत आलेले आहे. महाविद्यालयाची स्वतंत्र आर. सी.सी. इमारत बांधणेत आलेली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशस्त क्रीडांगण तयार करून देणेत आलेले आहे. सदर महाविद्यालयात ४०३ मुले व मुली शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयातील पैलवान विद्यार्थी कुस्ती खेळामध्ये विद्यापीठाचे नेतृत्व करून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे. तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेवून त्यामध्ये यश संपादन करीत आहेत.
गावातील व परिसरातील स्पर्धा परीक्षा व वेगवेगळ्या भरती प्रक्रियासाठी अभ्यास करणे करिता ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतंत्र आर. सी.सी. इमारत बांधून त्यामध्ये अभ्यासिका सुरु करणेत आलेली आहे. सदर अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांचा सराव करून दोन वर्षात गावातील १५ विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय पदावर निवड झालेली आहे.
गावाची शेती व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था –
गावच्या शेतीच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी शासन स्तरावरून स्व. आमदार संपतराव (आण्णा) देशमुख यांच्या अथक प्रयत्नातून गावाच्या पश्चिम असणाऱ्या टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी गावात आणणे शक्य झाले आहे. तसेच गावच्या पूर्वस ताकारी उपसी सिंचन योजनेचे पाणी सुरु झाले आहे. या योजनेमुळे तसेच साखळी कीट व कोल्हापूरी बंधारे, मातीचे बंधारे, ओढे व नाले साफसफाई विहिरी पुर्नःभरण, बोर पुर्नःभरण, वनराई बंधारे, जुन्या बंधाऱ्यातून गाळ काढणे त्यामध्ये पावसाचे पाणी साठविणे अशा विविध प्रयत्नामुळे गावच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्न मिटला आहे.
गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी शासन स्तरावरून व लोकसभागातून नेलीं तलाव येथे गाव पाणी पुरवठा विहीर खुदाई केलेली आहे. तसेच महादेव ओढा तिरावर मळीच्या शेतात श्री. सयाजीराव (आबा) देशमुख यांनी स्वतची २ गुंठे जमीन गावासाठी दान करून त्या ठिकाण राष्ट्रीय पेयजल योजनेतून नवीन पाणी पुरवठा विहीर खुदाई करणेत आलेली आहे. तसेच गावालगत वडलाई मंदिराच्या पश्चिमेस वडलाई विहीर पुरातन काळातील आहे. सदर तिन्ही ठिकाणावरून पाईप लाईन द्वारे पाणी ग्रामपंचायतीच्या जल शुद्धीकरण केंद्रामध्ये आणलेले आहे. त्यामुळे गावाला पिण्याचे पाणी शुद्ध व शाश्वत देण्यास ग्रामपंचायतीला यश आले आहे. केंद्र शासनाच्या हर घर जल योजनेंतर्गत गावातील संपूर्ण वाडी वस्तीवर पुरेश्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे.
आरोग्य विषयक सोयी सुविधा –
गावामध्ये आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र गावाच्या जागेच्या मालकीत दोन मजली आर.सी.सी. इमारत उभारणेत आलेली आहे. सदर उपकेंद्रामार्फत गावातील व परीसारातील सर्व समाजातील लोकांना आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातात. तसेच सदर ठिकाणी शासकीय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, नर्स, आशा सेविका इ. काम करिता आहेत. या उपकेंद्रमार्फात गरोदर माता यांचे आरोग्याच्या दृष्टीने विशेष सेवा पुरविले जाते. लहान मुलांचे लसीकरण वेळोवेळी केले जाते. आरोग्य विषयक वेगवेगळे कॅम्प घेवून आरोग्य तपासणी केली जाते व योग्य उपचार केले जातात. वरील सर्व कामे व आरोग्य सेवा मोफत पुरविली जाते.
गावातील विकास कामे –
गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत छोटे व मोठे रस्ते अत्यंत खराब होते त्यावरून चालता येत नव्हते तसेच गावातील सांड पाण्याची अवस्था बिकट होती. त्यासाठी मुख्य रस्ते डांबरीकरण, अंतर्गत रस्ते कॉक्रीटी करण व पेव्हर ब्लॉक तसेच संपूर्ण गावामध्ये सांडपाण्यासाठी बदिस्त गटर, घन कचरा व्यवस्थापण करणे हि कामे करण्यात आली तसेच दलित वस्ती सुधारणा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना, यशवंतराव मुक्त वसाहत, अपंग घरकुल योजना व अपंग पेन्शन योजना, संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजना, उज्वला गॅस योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन विहीर, विहीर व तलावातील गाळ काढणे, पानंद रस्ते, गुरांचा गोठा, फळबाग लागवड, नाडेफ, शौषखड्डे, वैयक्तिक शौचालय बांधकाम या सारखी योजना गावामध्ये राबविण्यात आली त्यामुळे गावामध्ये ग्रामपंचायत “आपल्या दारी,, ही संकल्पना निर्माण झाली.
महिला सबलीकरण या संकल्पना अंतर्गत गावामध्ये पहिल्यांदा महिला बचत गट स्थापन करण्यात आले. जास्तीत जास्त बचत गट स्थापन होण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत आर्थिक सहाय्य करण्यात आले व महिला मिटिंग घेवून कौशल्य व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले त्यामुळे महिला सबलीकरणास मदत झाली.
सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत व लोक सहभागातून गायरान मध्ये, सार्वजनिक ठिकाणी व वैयक्तिक शेतकऱ्याच्या बांधावर भरपूर प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली त्यामुळे गावामध्ये हिरवळी निर्माण होऊन गावातील प्रदूषण कमी झाले व वन्य जीव वाढीस मदत झाली. उदा. हरीण, ससा, तरस, कोल्हा, सायाळ व मोर अशा प्रकारचे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणत आढळून येतात.
आमच्या गावामध्ये महादेव रस्ता, विटा रोड व गरुड वस्ती येथे स्मशानभूमी व गावात एक दफनभूमी आहे.
गावातील वीज बिल कमी येणेच्या दृष्टीने गावाच्या पाणीपुरवठा विहिरीवर सौर उर्जा प्रकल्प बसविणेचे काम चालू आहे.
आमचे संपूर्ण गाव CCTV कक्षेत आणले आहे.
या कामी गावातील सर्व जनतेचे लाभलेले सहकार्य कौतुकास्पदच आहे!….