पावलो पावली बळ देणारी, जगणं घडवणारी, शाळा म्हणजे शिस्त, आयुष्याला वळण देणारी, जगण्याला अर्थ देणारी, शाळा म्हणजे माहेर याच महाविद्यालयाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात शिकलेल्या या सावित्रीच्या लेकीचा माहेरच्यानीच यथोचित सन्मान करुन भावी काळात यशस्वी आयुष्य जगण्यासाठीची नव ऊर्जा दिली आहे.

कला वाणिज्य महाविद्यालय कडेपूर येथे महिला सक्षमीकरण, अंतर्गत तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षांतर्गत महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनींचा सौ. सरोजिनी लालासाहेब यादव यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थिनी सौ. राजश्री जाधव म्हणाल्या की या महाविद्यालयात शिक्षण घेतले. मी पंचायत समिती, साताऱ्याचे सभापतीपद भूषविले. माझ्या जडणघडणीत कॉलेजचे खूप मोठे योगदान आहे,
सौ. हर्षदा साळुंखे म्हणाल्या की, मी कराडमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत असून या महाविद्यालयाने आपल्याला ज्ञान, विज्ञानाबरोबरच सुसंस्कारांची शिदोरी दिली आहे. या महाविद्यालयाशी व कडेपूरशी आपली घट्ट नाळ जोडलेली असून आपण या शाळारुपी माहेरास कधीही विसरू शकणार नाही, तर कडेपूर गावाविषयी असलेली आपली आत्मीयता व्यक्त केली व आपण या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे विशद केले. सौ. स्मिता पवार म्हणाल्या की मी पुणे महानगरपालिके मध्ये झोनल ऑफिसर म्हणून काम करत आहे. या महाविद्यालयाने विविध स्तरांवर आपल्याला नेतृत्वाची संधी मिळवून दिली, महाविद्यालयातील माहेरच्याच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने आपणास वेळोवेळी प्रोत्साहन देऊन सहकार्य केल्याबद्दल ऋण व्यक्त केले. क्ष पुणे येथे ए.पी.आय. असलेली माजी विद्यार्थिनी सौ. हसिना शिकलगार यांच्या वडिलांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. तर अष्टपैलू असणाऱ्या श्रीमती शारदा यादव यांच्याही सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे

प्राचार्य डाँ लालासाहेब जाधव म्हणाले की महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्यानी कुटुंबाबरोबरच समाजाचा विरोध न जुमानता स्त्री शिक्षणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सावित्रीबाई फुले यांनी जीवाची तमा न बाळगता स्वतः शिकून मुलींना शिक्षित करण्याचे आपले व्रत सिद्धीस नेले. आज पृथ्वीवर अवकाश ते समुद्र या सर्व ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया काम करताना दिसत आहेत. यामागे सावित्रीबाई फुले यांची प्रेरणाच आहे. प्रारंभी प्रास्ताविक व सर्व उपस्थिताचे स्वागत प्रा. अरुणा पोटे यांनी केले
कार्यक्रमास माजी विद्यार्थिनींचे कुटुंबीय, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुणा शिंदे व श्रीमती नीलिमा थोरात, ग्रंथपाल यांनी आभार मानले.




