






दि. 03 मे 2026 रोजी कडेपूर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुका स्तरीय तपासणी व पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी पंचायत समिती वाशी, जि. धाराशिव येथील गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड, उपअभियंता (ग्रापापु) उपविभाग वाशी जि. धाराशिव, अजय हळदे, विस्तार अधिकारी (पंचायत) व्ही. बी. रुपनर, तालुका व्यवस्थापक आरजीएसए ओंकार उंदरे तसेच प्रशासन सहाय्यक (लेखा) संदीप लोंढे उपस्थित होते.
या वेळी ग्रामपंचायतीच्या विविध योजना, विकासकामे, प्रशासनिक नोंदी तसेच सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी कामकाजाची माहिती घेतली. ग्रामपंचायतची सुसज्ज इमारत, ग्रामपंचायत ने ई-गव्हर्नर्स मध्ये केलेल्या कामाची पाहणी केली व त्याची कौतुक केले. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविला पाहिजे असे मत मा. गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केले.
गावातील जिल्हा परिषद शाळा,AI अंगणवाडी, डिजिटल वाचनालय या सुसज्ज इमारती पाहून सर्व अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले
ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्यात आले आहे असे मत व्यक्त केले
यावेळी कडेपूर ग्रामपंचायत सरपंच श्री सतीश भाऊ देशमुख यांनी ग्रामपंचायत ने ई-गव्हर्नर्स व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये केलेल्या कामाची थोडक्यात प्रस्तावना केली यावेळी पंचायत समिती सदस्य, सौ. पूनम माळी, कडेगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री वाजे साहेब, विस्ताराधिकारी (पंचायत) श्री. लोहार साहेब पंचायत समितीचे सर्व खाते प्रमुख, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद शाळेचा सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य उपकेंद्र सर्व स्टाफ, आशा सेविका, प्रभाग संघ व्यवस्थापक, CRP, बचत गट अध्यक्ष सचिव व बचत गटातील सर्व महिला व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

