ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

आज दिनांक २६/०६/२०२५ रोजी राजलक्ष्मी मंगल कार्यालय, कडेपूर येथे जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार कार्यालय कडेगाव तसेच मंडल कार्यालय कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले.

या शिबिरास ग्रामपंचायत कडेपूर व कडेपूर गावातील नागरिकांसह परिसरातील गावांतील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला.

या वेळी खालील मान्यवर उपस्थित होते:

🔹 मा. श्री. रंजीत भोसले साहेब – उपविभागीय अधिकारी, कडेगाव – पलूस
🔹 मा. श्री. अजित शेलार – तहसीलदार, कडेगाव
🔹 मा. श्री. प्रशांत राऊत साहेब – गटविकास अधिकारी, पंचायत समिती कडेगाव
🔹 मा. सौ. वैष्णवी पुजारी – नायब तहसीलदार, महसूल विभाग, कडेगाव
🔹 मा. श्री. झारटे साहेब – पुरवठा अधिकारी, तहसील कार्यालय कडेगाव
🔹 मा. श्री. मनोहर पाटील – मंडळ अधिकारी, मंडल कडेगाव

तसेच स्थानिक पातळीवरील पुढील मान्यवर ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपस्थित होते:

🔸 श्री सयाजीराव (आबा) देशमुख – ज्येष्ठ नेते
🔸 श्री धन्यकुमार विलासराव यादव देशमुख – चेअरमन, सर्व सेवा सोसायटी, कडेपूर
🔸 श्री धनाजी शिवाजीराव यादव – चेअरमन, कै. आमदार संपतराव (अण्णा) देशमुख सर्व सेवा सोसायटी
🔸 श्री वैभव यादव – उपसरपंच, कडेपूर
🔸 श्री अनिल यादव, श्री पतंगराव यादव, श्री दीपक परदेशी – ग्रामपंचायत सदस्य, कडेपूर

शिबिराची वैशिष्ट्ये:

✅ विविध महसूल व शासकीय विभागांच्या सेवांची उपलब्धता
✅ रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे दाखले आदींचे वाटप
✅ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, रेशन कार्ड, अपंग नोंदणी, वारस नोंदी, विवाहनोंदणी, जाती प्रमाणपत्र अशा अनेक सेवांचा लाभ
✅ शासकीय कामांसाठी लोकांना तहसील किंवा इतर कार्यालयात जावे न लागता “शासन आपल्या दारी” या उपक्रमातून थेट सेवा मिळाल्यामुळे लोकांच्या वेळेची व पैशांची मोठी बचत

लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

या शिबिरात कडेपूर व आसपासच्या अनेक गावांमधील नागरिकांनी उपस्थित राहून आपली कामे केली.
या योजनेमुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या गरजेच्या सेवा एकाच ठिकाणी, एका दिवसात मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.

ग्रामपंचायत कडेपूर व कडेपूर ग्रामस्थ यांच्यावतीने

या यशस्वी आयोजनासाठी मा. जिल्हाधिकारी सांगली, तहसीलदार कडेगाव, मंडल अधिकारी, व सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading