







आज दि. 07/10/2025 रोजी ग्रामपंचायत कडेपुर व नारिशक्ती महिला प्रभागसंघ, कडेपूर ता. कडेगाव जि. सांगली येथे मा. प्रकल्प संचालक तथा सहसंचालक जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, सांगली नंदिनी घाणेकर मॅडम यांनी आदर्श प्रभागसंघ vision 2 च्या प्रशिक्षणास भेट दिली.यावेळी vision प्रशिक्षणाचे महत्व, गरज, याविषयी तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबद्दल सर्व उपस्थिताना बहुमोल मार्गदर्शन केले.
त्यावेळी माजी उपसरपंच श्री अनिल यादव यांच्या हस्ते घाणेकर मॅडम यांचा सत्कार करण्यात आला तसेच माजी उपसरपंच पतंगराव यादव आधार नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री शंकर यादव श्री दीपक परदेशी ग्रामपंचायत सदस्य श्री शकील मुलानी ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर उपस्थित प्रभागसंघ कार्यकारिणी सदस्यांना प्रभागसंघाचा व्यवसाय सुरु करणेबद्दल चर्चा करून त्याकरिता सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. कडेपुर गावातील सुरू असणाऱ्या घरकुल चा आढावा घेतला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याबाबत केलेलं कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मा. गट विकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत साहेब, जिल्हा व्यवस्थापक SIIB-CB श्री. अतुल नांद्रेकर सर, BM MIS M&E श्री. दस्तगीर मुल्ला उपस्थित होते.

