पुणे येथे महिला व बालिका स्नेही दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील एकूण ३४ सरपंच आणि ग्रामसेवक यांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातून कडेपूर ग्रामपंचायतीची निवड झाली, ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे.
कार्यशाळेमध्ये यशदा संस्थेचे संचालक मा. माल्लीनाथ कलशेट्टी, देव मॅडम, राजेश खांडगे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख यांनी गावामध्ये महिला व बालकल्याण क्षेत्रात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कडेपूर ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेली कार्ये आणि भविष्यातील योजना त्यांनी प्रभावीपणे मांडल्या.
कार्यक्रमाच्या सांगतेस सरपंच सतीश देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच, ग्रामपंचायत अधिकारी श्री. शकील मुलाणी आणि अण्णासाहेब उपस्थित होते.










