पुणे येथे महिला व बालिका स्नेही दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील ३४ सरपंच आणि ग्रामसेवक यांची निवड करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातून कडेपूर ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. कार्यशाळेमध्ये यशदा संस्थेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, देव मॅडम, राजेश खांडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख यांनी गावामध्ये महिला व बालकल्याण क्षेत्रात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कडेपूर ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलेले कार्य, भविष्यातील योजना त्यांनी प्रभावीपणे मांडल्या. कार्यक्रमाच्या सांगतेस सरपंच सतीश देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. ग्रामपंचायत अधिकारी शकील मुलाणी यावेळी उपस्थित होते.




