ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपूर सोसायटीची प्रगती कौतुकास्पद : सतीश देशमुख

कडेपूर सर्व सेवा सहकारी सोसायटीने नेहमीच

सभासदांच्या हिताचा विचार करून आर्थिक स्थैर्य आणि सहकाराच्या माध्यमातून प्रगती साधली आहे. सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी राबवण्यात येणारी कै. आ. संपतराव देशमुख शेतकरी कन्यादान योजना ही राज्यभर एक आगळावेगळा आदर्श निर्माण करणारी योजना ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने तब्बल ४३ लाख रुपयांचा नफा मिळवत तो सभासदांच्या हितासाठी उपयोगात आणला आहे. तसेच, १० कोटी रुपयांचे कर्जवाटप करून शेतकरी व सभासदांचे आर्थिक पाठबळ वाढवले आहे. कडेपूर सोसायटीची ही भरभराट कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख यांनी केले. ते कडेपूर (ता. कडेगाव) येथील कडेपूर सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या ९५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन धन्यकुमार यादव, व्हा. चेअरमन शंकर यादव, बँकेचे फिल्ड ऑफिसर हणमंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त सोसायटी सभागृहात सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ संच्यालक जीवाजी यादव यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेचे सर्व संचालक मंडळ शेतकरी सभासद, संस्थेचे सचिव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading