
कडेपूर येथे ग्राम वन समितीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून गावातील वनसंपत्तीचे संवर्धन, संरक्षण, आणि विकासासाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्या.
बैठकीस सरपंच श्री. सतीश देशमुख, वन समितीचे अध्यक्ष श्री. विश्वजीत (बापू) यादव, उपाध्यक्ष श्री. शाहीर (बाप) यादव, सचिव वनपाल गवते साहेब, वन विभागाचे मुसळे साहेब, ग्रामसेवक श्री. मुलांनी अण्णासाहेब, तसेच समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य श्री. पतंगराव यादव, दीपक परदेशी, तानाजीराव यादव, प्रविण यादव, राहुल पोळ, सतीश शिल्वर यादव, आणि वैभव यादव उपस्थित होते.
या बैठकीत वन संरक्षणासोबतच ग्रामविकासाशी निगडीत उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला. उपस्थित सदस्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवून उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

