दिनांक ८ मार्च २०२५ रोजी कडेपूर ग्रामपंचायत आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसचिवालयाच्या सभागृहात महिला सभा आणि महिला स्नेही व बाल स्नेही ग्रामपंचायत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात यशदा, पुणे येथील प्रशिक्षक मा. प्रशांत मून आणि शीतल शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. लालासाहेब जाधव, प्राचार्य आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर, आणि सौ. मंदाताई करांडे, माजी सभापती पंचायत समिती, कडेगाव, होते. अध्यक्षस्थानी श्री. सतीश देशमुख, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत कडेपूर, होते. या प्रसंगी ग्रामपंचायत कडेपूरच्या वतीने गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वतीने कडेगाव तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५० महिला बचत गट सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रशिक्षणाद्वारे महिलांचे हक्क, सक्षमीकरण आणि बालकल्याण विषयक माहिती देण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला संजय गांधी निराधार योजना सदस्य सौ. अनिता यादव, उपसरपंच श्री. वैभव यादव, माजी उपसरपंच श्री. अनिल यादव आणि श्री. पतंग यादव, सदस्य श्री. हनुमान गरुड, श्री. दीपक परदेशी, श्री. विकास करकटे, सौ. वैशाली यादव, सौ. भारती यादव, सौ. लता यादव, सौ. अनुजा यादव, सौ. मीनाक्षी कोळी, सौ. सुनीता पिंगळे, सौ. उषा वाघमारे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
महिला स्नेही आणि बाल स्नेही ग्रामपंचायत उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना महिलांचे सक्षमीकरण आणि बालकल्याणासाठी कार्य करण्याचे उद्दिष्ट आहे. यशदा, पुणे आणि पंचायती राज मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते.
कडेपूर ग्रामपंचायत आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. उपस्थित सर्व मान्यवर, सदस्य आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


















