मौजे कडेपूर गावाची वायू गुणवत्ता तपासणी ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली होती. सदर तपासणीचा अहवाल ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे.
अहवालानुसार, गावातील वातावरणातील हवा अतिशय चांगली असून प्रदूषणाचा स्तर नियंत्रणात आहे.
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि स्वच्छतेबाबत घेतलेल्या उपाययोजनांमुळे ही सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील काळातही स्वच्छ व निरोगी वातावरण टिकवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी योगदान द्यावे, ही विनंती.
सोबत तपासणी अहवाल माहितीस्तव प्रसिद्ध करण्यात येत आहे.
– ग्रामपंचायत, कडेपूर


