प्रसिद्धी पत्रक
दि. ०१/०२/२०२५
धनगर वाड्यातील बंदिस्त गटार व काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ
कडेपूर ग्रामपंचायतच्या वतीने धनगर वाड्यातील अंतर्गत तसेच समोरील भागातील बंदिस्त गटार व काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे संपूर्ण वाड्यात स्वच्छता राहील तसेच नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या सुटणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून वाड्यात पावसाळ्यात चिखल साचणे, सांडपाण्याचा निचरा न होणे आणि दुर्गंधी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र, सदरच्या बंदिस्त गटार आणि काँक्रीटीकरणाच्या कामामुळे हे प्रश्न कायमस्वरूपी सुटतील. या कामामुळे पावसाळ्यात चिखलाचा त्रास टळेल, रस्ते सुरक्षित व स्वच्छ राहतील आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल.
ग्रामस्थांनी या कामात सहकार्य करावे, तसेच सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत कडेपूरच्या वतीने करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत, कडेपूर













