ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कडेपूर येथे सन २०२४-२५ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

गुरुवार दिनांक ३०/०१/२०२५ रोजी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कडेपुर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे सन २०२४-२५ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ राजलक्ष्मी मल्टीपर्पज हॉल कडेपुर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री राजेंद्र कांबळे (साहेब) यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विविध शालेय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विविध बक्षीसे आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला होता. हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आदरणीय श्री. सतीशराव ज्ञानदेव यादव (आबा) (ग्राम शिक्षण समिती सदस्य), श्री. विश्वजीत महावीर यादव (बापू) (ग्राम शिक्षण समिती सदस्य) श्री व सौ. मनीषा मिलिंद यादव (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती),श्री. दत्तात्रय यादव (ग्रामशिक्षण समिती सदस्य) या सर्व मान्यवरांनी बहुमूल्य आर्थिक मदत केल्यामुळे संपन्न करता आला. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास कडेपूरचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री.महादेव माळी (साहेब), आदरणीय श्री. राजकुमार यादव (बापू)( पोलीस पाटील कडेपूर), श्री. पतंगराव यादव (विद्यमान उपसरपंच), श्री. अनिल यादव (बापू माजी उपसरपंच), श्री. तानाजी यादव (उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती) श्री. भरतसिंह यादव (बाबा) (ग्रामशिक्षण समिती सदस्य) श्री. विलास यादव (बाबा) (ग्राम )शिक्षण समिती सदस्य) श्री अधिकराव मोहिते (ग्रामशिक्षण समिती सदस्य), सर्व शालेय समित्यांचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी पालक समस्त ग्रामस्थ कडेपुर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading