ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैभव यादव यांची बिनविरोध निवड!

ज्येष्ठ नेते मा. श्री. लालासाहेब (आबा) यादव, माजी आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) देशमुख, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली मा. श्री. संग्राम (भाऊ) देशमुख ज्येष्ठ नेते माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती विटा मा. श्री. विलासराव (तात्या) यादव देशमुख,यांच्या मार्गदर्शनाखाली कडेपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी  श्री. वैभव पांडुरंग यादव यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज, दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने श्री. वैभव यादव यांचा ज्येष्ठ नेते महावीर (काका) यादव देशमुख यांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच श्री. सतीश (भाऊ) देशमुख, ज्येष्ठ ग्रामस्थ धनाजी यादव, विश्वजीत यादव देशमुख, भरत यादव, भगवान घारगे,धनंजय यादव माजी चेअरमन आधार नागरिक पतसंस्था, शिवाजी लोहार माजी सरपंच,अनिल यादव माजी उपसरपंच, संतोष कोळी माजी उपसरपंच, ऋषिकेश यादव, तसेच ग्रामस्थ, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, आणि कर्मचारी उपस्थित होते.

श्री. वैभव यादव यांच्या निवडीमुळे गावातील तरुण वर्गात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या विकासकामांना नवी गती मिळेल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.

ग्रामपंचायत, कडेपूर.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading