अभिनंदन
दि. २६ जानेवारी २०२५
कडेपूर गावासाठी अभिमानाचा क्षण! कडेपूरचे सुपुत्र आणि मुंबईचे कलेक्टर मा. संजय लालासाहेब यादव (भय्या) यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रशासन कार्यासाठी आणि जनसेवेसाठी देशाच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते प्रतिष्ठित राष्ट्रपती पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
मा. संजय यादव यांचे प्रशासन क्षेत्रातील योगदान नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे. त्यांच्या दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठा, आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे हा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे.
या अभिमानास्पद क्षणाने काडेपूर ग्रामस्थांचे डोळे आनंदाने भरले आहेत. त्यांच्या या मोठ्या यशाबद्दल ग्रामपंचायत काडेपूर व समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
आज गावातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्यामुळे अभिमान वाटत असून, त्यांच्या या यशामुळे काडेपूर गावाचा लौकिक उंचावला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामपंचायत काडेपूर
सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन!


