ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमर यादव यांची निवड

कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमर जालिंदर यादव यांची निवड करण्यात आली आहे. कडेपूर जि.प.शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती निवडीची प्रक्रीया पार पडली. यात अध्यक्षपदी अमर यादव यांची एकमताने निवड करण्यात आली नवनिर्वाचित अध्यक्षांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्ष अमर यादव म्हणाले येणाऱ्या काळात कडेपूर जिल्हा परिषद शाळा ही तालुक्यातील आदर्श व मॉडेल स्कूल करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे पालक व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

Scroll to Top