हणमंत मिस्त्री ते विष्णू सुतार यांच्या घरापर्यंत रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर समाधान झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. या रस्त्याच्या विकासामुळे स्थानिकांना आता दळणवळणाची अधिक सोय उपलब्ध होणार असून त्याचा ग्रामविकासाला मोठा फायदा होईल.
ग्रामपंचायतीच्या अथक प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या पाठिंब्यामुळे हा प्रश्न निकाली लागला आहे. रस्त्याच्या उभारणीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचा ग्रामस्थांनी आभार व्यक्त केला आहेत.

