कडेपूर ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात लोकनियुक्त सरपंच श्री. सतीश देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा गौरव करणारे भाषण आणि अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– ग्रामपंचायत कडेपूर



