ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपूर येथे श्रीमद् ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात

डोंगराई देवीच्या कुशीत वसलेल्या कडेपूर ता कडेगाव येथे शुक्रवार दि १८ पासुन पारंपारिक पद्धतीने साजरा होणार्या पारायण सोहळायला सुरुवात झाली आहे कडेपूर हे मोठ्या लोकसंख्येचा गाव असले तरीही मोठे आध्यात्मिक आणि धार्मिक वृत्तीची लोक समाजामाचा मानसिकता या गावांमध्ये आहे त्यामुळे या समाज मानसिक तेथूनच गावामध्ये धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग सक्रिय झालेला दिसतो. कडेपूर गावांमध्ये ऐतिहासिक कालापासूनच म्हणजे ४० वर्षापासून पारायणाची एक वेगळी परंपरा राहिलेली आहेत ज्ञानोबा तुकोबांच्या समतेचा

एकत्रीचा विचार तळागाळामध्ये रुजवून वारकरी संप्रदायाची भगवी पताका समतेच्या दिशेने पंढरपूरच्या वारीमध्ये विलीन होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावरती लीन होण्याची आणि एकतेची समतेची वारे अखंड वाहण्याची कडेपूरची ही परंपरा या पारायण सोहळ्याच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे या पारायण सोहळ्याच्या माध्यमातून कडेपूर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवचन कीर्तन सेवेचा लाभ इथल्या असणाऱ्या भाविक भक्तांना दिला जातो त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या एकथेच्या संस्थेच्या प्रबोधनाचा विचार कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून गावगाड्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. या

पारायण सोहळ्याच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ग्रंथांच्या असणारे ओवींच्या माध्यमातून संदर्भाच्या माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तनाचा विचार रुजवण्याची भूमिका अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम अशा पर्यायाच्या माध्यमातून निर्माण केले जातात या पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आबाल वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच महिला या क्षेत्रातील सर्वच लोकांचा सहभाग मोठ्या संख्येने होत असल्यामुळे गावांमधील एकता आणि एकात्मता वाढीस लागत आहे या पारायण सोहळ्याच्या अंतिम दिवशी काल्याचे किर्तन आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये गावातील सर्वच भाविक भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसादारांचा मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करून हा सोहळा केला जातो.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading