जिल्हा परिषद, सांगली यांच्या वतीने देण्यात येणारा “पायाभूत सुविधा युक्त गाव” हा गौरवपूर्ण पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. तृप्ती धोडमिसे मॅडम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. शिंदे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी मा. अविनाश पाटील साहेब व यशदा पुणेचे प्रशिक्षक श्री. साहिल शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी कडेपूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मा. सतीश देशमुख (भाऊ), ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे कडेपूर गावाचे नाव जिल्हा व राज्यस्तरावर गौरवाने घेतले जात आहे. गावाने केलेल्या स्वच्छता, आरोग्य, पाणी, कचरा व्यवस्थापन, लोकसहभाग, डिजिटल कामकाज आदी विविध घटकांतील उत्तम कामगिरीची दखल घेत जिल्हा परिषदेमार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार!
– ग्रामपंचायत कडेपूर



