ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

रील स्टार वैभव गावडे आणि DDSR ग्रुपचे मालक हणमंत मोटे यांची कडेपूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट

सोशल मीडियावर आपल्या प्रभावी अभिनयामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेले रील स्टार वैभव गावडे आणि DDSR ग्रुपचे संस्थापक व उद्योजक श्री. हणमंत मोटे यांनी कडेपूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सतीश भाऊ देशमुख यांच्या हस्ते दोघांचाही शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव यादव, सदस्य अनिल यादव, मधुकर पिंगळे, धनाजी यादव अण्णा , तसेच बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष जीवन करकटे, आधार नागरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अजित यादव, विश्रांत मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सत्कारानंतर झालेल्या संवादात गावातील तरुणांनी डिजिटल माध्यमातून कला, उद्योजकता आणि सामाजिक कार्यात पुढे यावे, यावर सखोल चर्चा झाली. वैभव गावडे व हणमंत मोटे यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक करत कडेपूर गावाने सामाजिक, डिजिटल व ग्रामविकासाच्या क्षेत्रात घेतलेली वाटचाल अत्यंत प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

गावाच्या वतीने दोन्ही पाहुण्यांचे आभार मानण्यात आले. ग्रामपंचायतीचा हा उपक्रम तरुणाईला प्रोत्साहन देणारा ठरला आहे.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading