ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपूर ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न

आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कडेपूर ग्रामपंचायत येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामपंचायत कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच श्री. सतीश भाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सकाळी ठिक ७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर उपस्थितांनी एकमुखाने राष्ट्रगीत गायले. त्यानंतर सरपंच श्री. सतीश भाऊ देशमुख यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच ग्रामविकास, स्वच्छता मोहिम आणि युवकांच्या सहभागावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला बचतगट सदस्य, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांनी देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.

Leave a Comment

Scroll to Top