🙏कडेपूर नगरीचे बिनविरोध सरपंच राजारामबापू यादव यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा ग्रामपंचायत कडेपूर येथे संपन्न झाला🙏
या कार्यक्रमाची प्रस्तावना माजी उपसरपंच मा. अनिल यादव यांनी केली.
तसेच मा. आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व लोकनियुक्त सरपंच मा. सतीश भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि राजारामबापू कुटुंबीय यांच्या वतीने त्यांचे नातू अमोल यादव यांनी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले.
माननीय पृथ्वीराज बाबा आणि सतीशजी भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बापूंनी केलेल्या विविध कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की राजाराम बापूंचा कार्यकाल हा 1974 ते 1981 असा होता. असा एक आदर्श सरपंच याआधी कधी झाला नाही आणि येथून पुढे कधी होणार नाही . असे गौरउद्गार मा. भाऊ यांनी काढले गावातील सर्व लहान मोठ्या लोकांना सोबत घेऊन लोकांसाठी आणि लोकांच्या हिताचे कार्य बापू अगदी सहजगत्या करत होते.
सर्व पक्षाच्या सर्व विचारांच्या सर्व लोकांना बापूंनी मांडलेले विचार पटत होते आणि ते सर्व त्यांना मान्यता देऊन काम करत होते. कारण बापू हे कोणतीही कार्य निस्वार्थपणे आणि लोकांच्या गावाच्या हितासाठीच करत होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुलींच्या साठी स्वतंत्र कन्याशाळा असेल, हायस्कूलची इमारत असेल गावातील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या मंडपाचे काम असेल मारुती मंदिरासमोरील सभागृहाच्या पायाभरणीचे काम असेल पोस्टाच्या इमारतीचे काम असेल अशी अनेक कामे लोकवर्गणीतून आणि लोकसभागातून उभी केली ते करत असताना त्याकाळी कोणताही निधी शासनाकडून उपलब्ध होत नसताना देखील लोक सहकार्यातून ही काम करणे सोपे नव्हते तरी विविध स्वरूपातून निधी जमा करून बापूंनी कामे पार पाडली. हा त्यांचा कार्य कौशल्याचा गौरवच म्हणावा लागेल.
अमोल यादव यांनी आभार व्यक्त करत असताना सतीशजी भाऊ यांचे विशेष आभार व्यक्त केले कारण त्यांच्या सहकार्यातूनच ही ॲम्बुलन्सची लोकसेवा लोकांपर्यंत पोचणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी कोणतीही अडकाठी न घेता हे कार्य करण्याचे मान्य केले. व ॲम्बुलन्सची इथून पुढील सर्व जबाबदारी ग्रामपंचायत तर्फे उचलली.
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने खालील मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते सयाजीराव देशमुख(आबा), विलासराव यादव (तात्या), विठ्ठलराव यादव (दादा) ग्रामपंचायत उपसरपंच वैभव यादव, सदस्य, तसेच मोहनराव यादव(काका), जयदीप भाऊ देशमुख, पंडितराव यादव नाना, बाळासाहेब यादव काका, वसंतराव यादव दुकानदार,जयदीप यादव काका ,नेताजीराव यादव (नाना), सुरेश देशमुख(दुबे नाना), डॉ.अरुण यादव, डॉ.महेश माळी, डॉ.संतोष महाडिक, शाहीर यादव बापू, प्रल्हाद यादव बापू, विश्वजीत यादव बापू, राजेंद्र यादव. विनोद यादव , दिनेश यादव, अजित चव्हाण , संजय यादव , दत्तात्रय यादव, विजय यादव, पतंगराव यादव, प्रमोद पवार, नितीन यादव , अप्पा स्वामी, दीपक परदेशी, हिम्मत मुलानी, संजोग यादव, ज्योतीराम आंबवडे तसेच सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते…
तसेच कार्यक्रमानंतर राजाराम बापूंच्या कुटुंबातील
राजाराम बापूंचे चिरंजीव वसंतराव(दादा), अशोकराव(तात्या), पुतणे – बाबुराव यादव भाऊ ,लालासाहेब यादव आप्पा ,भरत यादव, संजय संजय यादव नाना, बापुराव यादव,सयाजी यादव नातु अमोल शंकरराव यादव,अजित यादव, संदिप यादव,सागर यादव यांनी कडेपूर ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी ऍम्ब्युलन्स सपूर्द केली…कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि अनावधाने कोणाचे नाव राहून गेले असेल तर क्षमा असावी. 🙏सर्वांचे मनापासून आभार.🙏




