शनिवार दिनांक – १६/०८/२०२५ रोजी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री. अभयकुमारजी साळुंखे साहेब यांनी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कडेपुर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे सदिच्छा भेट दिली व शाखेतील विविध विकास कामासंदर्भात पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय लालासाहेब यादव (आबा) यांनी संस्थेसाठी केलेल्या अत्यंत अनमोल कार्याची आणि संस्थेला दिलेल्या योगदानाची आवर्जून आठवणही काढली. विद्यालयाची कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्री. सतीशराव देशमुख (भाऊ) व समस्त ग्रामस्थ कडेपुर यांच्या सहकार्यातून होत असलेली प्रगती पाहून अत्यंत समाधान व्यक्त केले. तसेच अनेक जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला. यावेळी कडेपूरचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्री. सतीशराव देशमुख (भाऊ) यांनी शाखे संदर्भातील विविध अडीअडचणी संदर्भात , शाखेत सुरू असलेल्या विविध विकास कामासंदर्भात , भविष्यात करावयाच्या विविध विकास कामा संदर्भात , शाखेत विद्यार्थी प्रवेश वाढीसाठी केल्या जात असलेल्या विविध योजना संदर्भात, आदरणीय कार्याध्यक्ष श्री. अभयकुमारजी साळुंखे साहेब यांच्याशी चर्चा केली व त्यांना संपूर्ण सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आदरणीय श्री. प्रदीप यादव सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली विभाग प्रमुख आदरणीय श्री. हाके सर , प्राचार्य आदरणीय श्री. लालासाहेब जाधव सर , आदरणीय श्री बेडगे सर , आदरणीय श्री. पाटील सर , आदरणीय सौ. वर्षा देशमुख मॅडम , श्री. राजेश पोळ सर (लेखनिक) , श्री. शंकर बागडे (नाना) व इतर मान्यवर उपस्थित होते.









