ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपूर ग्रामपंचायतीत मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

दि. २७ जानेवारी २०२५

कडेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने मकर संक्रांती निमित्त आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला गावातील ९०० पेक्षा जास्त महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ. वैशाली यादव, सौ. अनुजा यादव, सौ. मीनाक्षी कोळी, सौ. सुनीता पिंगळे, सौ. लता यादव, सौ. उषा वाघमारे आणि सौ. भारती यादव यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिलांना संक्रांतीचा वान म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने सेंद्रिय गुळाची १ किलोची ढेप भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

गावातील महिलांचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात नेहमीच सक्रिय सहभाग राहिलेला आहे. यामुळे शासनाच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात मोठी मदत होत आहे.

महिला वर्गाने व्यक्त केलेल्या समाधानामुळे ग्रामपंचायतीच्या उपक्रमांना अधिक बळ मिळाले आहे. कडेपूर ग्रामपंचायतीने महिला सबलीकरण आणि सामाजिक सहभाग यासाठी उचललेले पाऊल प्रेरणादायक आहे.

ग्रामपंचायत कडेपूर

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading