सन २०२५ चा *लोकमत सरपंच ऑफ द इयर* हा जिल्हास्तरीय पुरस्कार विज व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कडेपूरचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्री. सतीशराव देशमुख (भाऊ) यांना प्रदान करण्यात आला. त्याबद्दल श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे अजिव सेवक आदरणीय श्री. बेडगे एस. आर. (साहेब) यांच्या हस्ते त्यांचा ग्रामपंचायत कडेपूर येथे जाऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्री. सतीशराव देशमुख (भाऊ) यांनी न्यू इंग्लिश स्कूल कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या शाळेत राबविलेल्या विविध विकास कामाची माहिती व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती आदरणीय श्री. बेडगे साहेबानां दिली तसेच भविष्यात विद्यार्थी वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री. राजेंद्र कांबळे (साहेब) , सौ. अलका यादव मॅडम, श्री. प्रदीप यादव सर , सौ. वर्षा देशमुख मॅडम , श्री. राजेश पोळ सर (लेखनिक) आणि ग्रामस्थ कडेपुर तसेच स्वतः सरपंच साहेब आणि पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत त्यांचीही माहिती त्यांनी यावेळी आवर्जून दिली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी आदरणीय श्री. मुलाणी एस. डी. (साहेब) ग्रामपंचायत कर्मचारी व बहुसंख्य ग्रामस्थ कडेपुर उपस्थित होते.



